05-10-2018 - 05-10-2018

समाजाच्या विकृत रुपाला आवर घालणे गरजेचे – डॉ. ललितकुमार धोका पिंपरी, ता. 6 – लहान मुलांवर होणा-या अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. समाजाचे हे विकृत रुप पहायला मिळत आहे. समाजाचे विकृत रुपाला आवर घालणे आवश्यक आहे, असे मत बालरोगतज्ञ डॉ. ललितकुमार धोका यांनी आकुर्डी येथे व्यक्त केले. पिंपरी चिंचवड करांच्या सदृढ आरोग्यासाठी आरोग्य व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेत आरोग्य विषयातील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. आकुर्डी येथील समाजसेवा केंद्रात शुक्रवार (दि. 5) ते रविवार (दि. 7) रोजी ही व्याख्यानमाला होणार आहे. व्याख्यानमालेचे यंदा तिसरे वर्ष आहे. रोटरी क्लब ऑफ चिंचवड, समाजसेवा केंद्र, पिंपरी चिंचवड डॉक्टर्स असोसिएशन, रोटरी क्लब ऑफ पिंपरी आणि इनरव्हील क्लब ऑफ पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे उदघाटन शुक्रवारी (दि. 5) ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मल्लिनाथ कलशेट्टी, सचिव बाळकृष्ण खंडागळे, पिंपरी चिंचवड डॉक्टर्स असोसिएशनचे चेअरमन डॉ. संजीव दाते, रोटरी क्लब ऑफ पिंपरीचे अध्यक्ष नितीन ढमाले, इनरव्हील क्लब ऑफ पिंपरीच्या अध्यक्षा मनीषा समर्थ आदी उपस्थित होते. व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉ. अच्युत कलंत्रे यांना रोटरी धन्वंतरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. डॉ. ललित कुमार धोका म्हणाले, लैंगिक आत्‍याच्यार झाल्‍यावरच शोषण झाले असे म्‍हणायचे का? हा प्रश्न समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लहान मुलांना आपल्‍यावर झालेल्‍या अन्यायाला आणि संकटाला तोंड देता येत नाही. अत्‍याचार झालेल्‍या मुलाने आपल्‍यावरील आत्‍याचाराबात कोणाकडे तक्रार मांडली तरी त्‍याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. त्‍या मुलावर कोणत्‍या प्रकारचे अत्‍याचार झाले आहेत, हे सुध्दा पाहिले जात नाही. पीडित मुलाला किंवा मुलीला आल्‍याचारानंतर अत्‍यंत वाईट परिस्‍थिला सामोरे जावे लागते. बेदम मारहाण, लैंगिक शोषण, छेडछाड, अपहरण, अर्भकांना बेवारस सोडून देणे, त्‍यांच्याशी अश्लिल भाषेत बोलणे, अशा अनेक प्रकारे लहान मुलांचे शोषण होते. ज्या कृत्‍याद्वारे मुलाच्या किंवा मुलीच्या शरीराला इजा पोहोचेल असा स्पर्श, आणि अशी कोणतीही कृती, भाषण, वर्तन ज्यामुळे ते मूल घाबरेल, लज्जित होईल, अवमानित होईल हे सर्व बालकाच्या शोषणा अंतर्गत मोडते. तसेच अशी कोणतीही कृती किंवा दुर्लक्ष ज्यामुळे मुलांची निकोप वाढ होण्यास बाधा येईल. एकलकोंडे पडल्‍याचा भास हाईल. ही सर्व कृत्‍ये बालकांच्या शोषणा अंतर्गत येतात. बालकाला कोणत्याही प्रकारची शारीरिक इजा करणे. डाग देणे, जाळणे, मारणे, गुद्दे घालणे, लाथा मारणे, छडीचा मार, मुलाला गदगदा हालविणे किंवा मुलाला इजा पोहोचेल असे वर्तनाने त्‍याचे शारीरिक शोषण होते. पालकांकडून मुलांना शिस्‍त लावण्यासाठी कोणत्‍याही प्रकारची शारीरिक शिक्षा केली तर त्‍या मुलाचे शारीरिक शोषण होते. वयाच्या ५ वर्षापासून १२ वर्षापर्यंतच्या मुलांना शोषणाचा व त्यांच्याशी गैरवर्तन केले जाण्याचा सर्वात जास्त धोका असतो. या अत्याचारांमध्ये शारीरिक, लैंगिक तसेच मानसिक अत्याचारांचा समावेश होतो. लहान मुलांना शिव्या देणे, त्‍यांच्यावर मानसिक अत्याचार करणे किंवा त्यांच्याशी मानसिक खच्चिकरण रणे भावनिक शोषणां अंतर्गत येते. पालक किंवा देखभाल करणार्‍या व्यक्तींकडून जास्‍त प्रमाणात भावनिक शोषण होते. मुलाला अंधार्‍या खोलीत बंद करणे, कपाटात बंद करणे किंवा बराच वेळ खुर्चीला बांधून ठेवणे किंवा मुलाला धमकावणे, घाबरविण्यासारखे प्रकार केले जातात. मुलाला कायम कमी लेखणे, त्याला सतत दूर लोटणे त्याचेवर निष्कारण आरोप करणे किंवा एखाद्या गोष्‍टीला जबाबदार धरणे हा सर्व प्रकार भावनिक शोषणात भर घालणारा आहे. सत्काराला उत्तर देताना डॉ. अच्युत कलंत्रे म्हणाले की, आरोग्य व्याख्यानमालेच्यानिमित्ताने समाजाचे प्रबोधन झाले पाहिजे हा मूळ उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ही व्याख्यानमाला घेण्यात आली. पुरस्कार मिळण्याइतपत मी मोठा नाही. मी मोठा झालो ते रोटरीतील माझ्या मित्रांमुळे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांनी ही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले. सूत्रसंचालन दिपाली पाटेकर यांनी केले.

Project Details

Start Date 05-10-2018
End Date 05-10-2018
Project Cost 35000
Rotary Volunteer Hours 64
No of direct Beneficiaries 1250
Partner Clubs Rotary club of Pimpri Innerwheel club pimpri
Non Rotary Partners Samajseva Kendra, Akurdi.
Project Category Maternal and child health